मैसूर -दरभंगा बागमती एक्सप्रेस मालगाडी ला धडकली,

🔺 सुमारे 12 प्रवासी गंभीर जखमी
🔺 तामिळनाडूतील तिरुवल्लर जवळ कवरापेट्टयी रेल्वे स्टेशनवर हे अपघात झाला.

तामिळनाडू-  चेन्नई –  मैसूर हून दरभंगा जाणाऱ्या गाडी नंबर 12578 मैसूर – दरभंगा बागमती एक्सप्रेस थांबलेल्या  मालगाडीला धडकली यात१२ व्यक्तीं गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात  हलवण्यात आलं आहे. अद्याप  जीवित हानी झाल्याची माहिती मिळाली नाही. घटनास्थळी मदत आणि बचाव पथक रवाना झालं असून अपघात कसा झाला याचा तपास केला जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार ही गाडी लूप लाईन मध्ये आल्यामुळे हा अपघात झाल्याचे  सांगण्यात  येत आहे. या अपघातात बागमती एक्सप्रेस च्या दोन डब्याला आग ही लागली आहे . तर सहा बोगी पटरी वरून उतरल्याची माहिती मिळते आहे. याबाबत प्रवासी आणि त्यांच्या नातलगांसाठी हेल्पलाइन नंबर ही जारी करण्यात आला असून तो
04425354151,आणि 04424354995 असा आहे.