शिवराज पाटील (चाकूरकर) यांच्या चुलत भावाची आत्महत्या

लातूर : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत बंधू चंद्रशेखर उर्फ हणमंतराव पाटील (८१) यांनी रविवारी सकाळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आजाराच्या मानसिक अवस्थेतून त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असे निकटवर्तीयांनी सांगितले.

चंद्रशेखर उर्फ हणमंतराव पाटील

चंद्रशेखर पाटील हे दररोज वृत्तपत्र वाचन, चहासाठी चाकूरकर यांच्या देवघर निवासस्थानी येत असत. रविवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे आले होते. कोणाला काही कळण्याच्या आत त्यांनी गोळी झाडून घेतली. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची दोन्ही मुले ऋतुराज व लिंगराज नामांकित वकील आहेत.