टाटा ट्रस्ट्सच्या चेअरमन पदी नोएल टाटा

🔷 टाटा ट्रस्ट्सची धुरा नोएल टाटांकड

🔺 टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड;

मुंबई : दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. रतन टाटा यां यांचे ९ ऑक्टोबर बुधवारी रात्री मृत्यू झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. शुक्रवारी टाटा ट्रस्ट्सच्या संचालक मंडळाची एक बैठक झाली. या बैठकीत चेअरमनपदासाठी ६७ वर्षीय नोएल टाटा यांच्या नावाला पसंती देण्यात आली.

‘टाटा ट्रस्ट्स’कडे सामूहिकरीत्या टाटा सन्सची मालकी आहे. ‘टाटा सन्स’ ही टाटा समूहातील सर्व कंपन्यांची मालक कंपनी आहे. या ट्रस्टच्या आधिपत्याखाली सर्व कंपन्या येतात.