नारायणगड दसरा मेळावा;
बीड/नारायणगड--बीड जिल्ह्यातील- धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणगडावर शनिवारी मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ३०० एकरांत मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा पार पडला. यावेळी जरांगे यांनी सरकारला आरक्षणाची म ागणी पूर्ण केली नाही, तर नाईलाजाने उलथापालथ करावीच लागेल असा निर्वाणीचा इशारा दिला. तुमच्या मनात जे, तेच आपण करणार असल्याचे मनोज पाटील जरांगे यांनी म्हटले आहे. येथून जाताना आनंद घेऊन जा, आणि दुखः सोबत न्या, असे आवाहन देखील त्यांनी केले.
■ आचारसंहितेपर्यंत शांत राहणार- लवकर निर्णय घ्या, असे मला सांगितले जात आहे. त्यांना तयारी करायला वेळ लागणार असल्याचे ते सांगत आहेत. मात्र, गेल्या १३ महिन्यांपासून आपण तयारीच केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने आरक्षण जाहीर करावे, नसता आचारसंहिता लागल्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आचारसंहिता लागल्यानंतर मुख्य भूमिका स्पष्ट करणार. तो पर्यंत आपण शांत राहणार असल्याचेही ते म्हणाले, राजकारणात प्रवेशाबाबत त्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. आचार संहिता लागण्यापूर्वी आरक्षण मिळाले नाही तर आपण भूमिका येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वेळप्रसंगी मरण स्वीकारेल मात्र, तुमची मान खाली घालणार नसल्याचे त्यांनी सांगितले. समाजाचे संख्याबळ वाढवण्याची मागणी देखील त्यांनी केली. म राठ्यांना आरक्षण देण्याची मागणी वारकरी संप्रदाय, हिंदू धर्माने आणि कायदा आणि संविधानाने अन्यायाविरोधात लढायची शिकवण दिली आहे. गोर गरिब मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. प्रत्येक जातीने आणि धमनि संविधानाच्या माध्यमातून सुविधा घेतल्या. मात्र, आम्ही १४ म हिन्यांपासून आरक्षण मागत असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. या वेळी मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली, आपण नारायण गडाचे खरे भक्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पण तिकडे धमक्याची भाषा वापरणाऱ्याच्या नाकावर चष्मा देखील टीकणार नसल्याची टीका त्यांनी केली. मराठा समाज सहन करणारा समाज नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आमच्या समूदायाच्या वाटेला केवळ अन्याय आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मराठा समाजाने कायम दुसऱ्यांसाठी आपली झीज केली असल्याचा दावा त्यांनी केला, आम्ही कधी गरिबांवर किंवा श्रीमंतावरही अन्याय केलेला नसल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा समाजाने कधीच जातीवाद केला नाही उपस्थित जनसमूदाय न्यायाचा आहे. एका दुखाः कडून या समूदायाला सुखाकडे जायचे आहे. हा समाज कधीच जातीवाद करत नाही. हा समूदाय कधीच मस्तीत वागला नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
■ १७ जातींच्या समावेशावर प्रश्न- राज्यातील १७ जाती ओबीसीमध्ये घालण्यात येत आहेत. मात्र, आम्हाला आमच्यात आधीच चारशेपेक्षा जास्त जाती असल्याचे आम्हाला सांगितले जात आहेत. मात्र, तुम्ही १७ जाती ओबीसींम ध्ये घातल्या तर तुम्ही महाविकास आघाडीकरुन लिहून घेतले का? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. आम्ही ओबीसीतून आरक्षण मागितले तेव्हा, आरक्षणाला धका लागत होता. आता १७ जाती ओबीसींमध्ये घालत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केले. पक्ष-पक्ष, नेता नेता करु नका, असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले.