🔷 अतुल परचुरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन ते 57 वर्षाचे होते.
मुंबई– मराठी सिनेविश्वातील नावाजलेलं नाव म्हणजे अतुल परचुरे. बालकलाकार म्हणून सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्याने मराठी सिनेसृष्टी गाजवून सोडली. विनोदी नाटक, सिनेमा, मालिका अशा विविधांगी माध्यमातून ते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले.
अतुल परचुरे हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेते होते. मराठी सिनेमा, नाटक आणि मालिकांमधून ते घराघरात पोहोचले होते. सिनेमा, नाटक आणि मालिकांमधून आपल्या विनोदानं प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू फुलवण्याचं काम त्यांनी केलं.
अतुल परचुरे यांच्या निधनानं मराठी मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेकांनी त्यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

