मुंबई : हैदराबादमध्ये आगामी चित्रपटातील एका धाडसी प्रसंगाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या दुर्घटनेत सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन जखमी झाले. हैदराबादेतील -रुग्णालयात उपचारानंतर अमिताभ बच्चन मुंबईला परतले असून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. बरगडी तुटल्यामुळे आपल्याला खूप जास्त वेदना होत असल्याचे अमिताभ यांनी ब्लॉगमधून त्यांचे स्पष्ट केले.
बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगद्वारे चित्रीकरणादरम्यान जखमी झाल्याची माहिती दिली आहे. ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटातील एका हाणामारीच्या दृश्याचे चित्रीकरण करताना आपल्या उजव्या बरगडीला इजा झाली. त्यामुळे चित्रीकरण रद्द करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबईला परतण्यापूर्वी हैदराबादस्थित एका रुग्णालयात त्यांचे सीटी स्कॅन करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.