आता येत्या काळात डिझेलमध्ये १५ टक्के इथेनॉल : नितीन गडकरी

उर्जा- जैवउर्जा-इथेनॉल

नवी दिल्ली : वाहनामध्ये वापरल्या जाणाऱ्या डिझेलमध्ये सुमारे १५ टक्के इथेनॉल मिसळण्यावरील संशोधनाचे काम प्रगती वर  असून त्याच्या वापरासाठी  सरकार ठोस पुराव्यांच्या आधारे त्याला प्राधान्य देण्याचे मार्ग शोधत असल्याची माहिती सोमवारी सीआयआयच्या जैवउर्जा शिखर परिषदेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले की, सरकारी आकडेवारीनुसार, देशात प्रारंभी पेट्रोल मध्ये  इथेनॉल मिश्रण २०१४ मधील १.५३ टक्क्यांवरून २०२४ मध्ये १५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ही प्रगत्ती लक्षात घेता सरकारने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.

भविष्यात इंडियन ऑइलने ४०० इथेनॉल पंप स्टेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील वाहन उत्पादक, टीव्हीएस, बजाज आणि होंडा यांसारख्या इतर कंपन्या इथेनॉल बाइक्ससह तयार आहेत आणि त्यांच्या बाइक लॉन्च करण्यासाठी इथेनॉल पंप येण्याची वाट पाहात्त आहेत, असे गडकरी म्हणाले.