कासचा फुलोत्सव हंगाम संपत आला

संग्रहित छायाचित्र

अनोखा निसर्ग – वर्ल्ड हेरिटेज दर्जा प्राप्त कास  पुष्पपठार 

सातारा-मेढा – कास पठाराचा हंगाम या वर्षी ५  सप्टेंबर पासून सुरू करण्यात आला होता. या हंगामासाठी कास पठारावर  प्रति व्यक्ती १५० रूपये शुल्क आकारले होते आता पठारावरील फुलांचे प्रमाण कमी झाल्याने बुधवार दि. १६ ऑक्टोबर पासून कास पठारावर ऑफलाइन पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे. वर्ल्ड हेरिटेज दर्जा प्राप्त पुष्पपठार कासचा फुलोत्सव हंगाम संपत आला असून www. kas.ind.in या अधिकृत संकेतस्थळावरून स्विकारले जाणारे कासचे बुकींग पंधरा ऑक्टोबर पासून बंद करण्यात आले आहे चांगल्या पावसामुळे  यावर्षी फुलांचे प्रमाण चांगले राहिले

आता यावर्षीचा फुलांचा बहर कमी झाल्याने प्रवेश शुल्क ५० रुपये असणार आहे. कास पठार परिसरात प्रवेश करायचा असेल त्यांना “कासच्या फुलांचे ऑनलाईन बुकींग बंद गेटवर तिकीट काढून थेट प्रवेश मिळणार आहे. पठारावरील काही भागात अजूनही फुले पाहावयास मिळत आहेत.  सोनकीचे प्रमाण जास्त आहे. तर राजमार्गावर असलेल्या कुमुदिनी तलावामध्ये ही कुमुदिनीची फुले अजूनही दिसतात. यावर्षीच्या सततच्या पावसामुळे कास पठार अजूनही हिरवेगार आहे. मात्र मोठ्या प्रमानात गवत वाढले आहे.

या गवतामुळे फुले दिसन ही कमी  झाल आहे. यावर्षी फुलांचे प्रमाण चांगले राहिल्याने पर्यटकांची संख्या मोठी होती. त्याकडे वनविभाग आणि कास समितीने पर्यायी मार्गाचा विचार करून आतापासूनच नियोजन केल्यास आगामी हंगाम तरी पर्यटकांसाठी सुखकर ठरणार आहे.