युवकांना कुशल बनवूनच अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी पोहोचेल : नरेंद्र मोदी

  • गुजरातच्या रोजगार मेळाव्यात २५०० युवकांना नियुक्तिपत्रे

अहमदाबाद : कुशल युवक हे भारताच्या आर्थिक विकासाच्या वाटचालीतील महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे युवकांना कुशल बनवूनच भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी म्हणाले. गुजरात सरकारच्या रोजगार मेळाव्याला ऑनलाइन माध्यमातून

संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी २५०० युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

विविध क्षेत्रांमधील वाढत्या संधींचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची गरज मोदींनी व्यक्त केली. देशात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत असेही ते म्हणाले.