🔷 सोसायटी आणि कॉलनी मध्ये लागले आचाऱ्यांचे स्टॉल
छत्रपती संभाजीनगर– दिवाळी आली की घराघरात फराळांचं बनवण्यासाठी महिलांची मोठी लगबग सुरू होते. दिवाळीचा फराळ आता बऱ्याच अंशी घरी करण्यात कमी होत असून बाजारातून तयार फराळाच्या वस्तू ही येता मोठ्या प्रमाणात मिळू लागले आहेत शक्य आणि त्या आवश्यक तेवढा फराळ घरी होतो बाकीच्या वस्तू मात्र आता बाजारातून मागवल्या जात आहेत
दिवाळी या सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा सण चार दिवस चालणारी दिवाळी आणि त्याच्यासोबत मिळणारा फराळाचा आनंद काही औरच असतो. महिलांसाठी मात्र फराळ बनवण्यापासून कामाला सुरुवात होते. घरी बनवलेल्या पदार्थांमध्ये शंकरपाळी, काठी शेव, साधी शेव, करंजी, अनारसे हे बनवले जाऊ शकतात पण काही पदार्थ मात्र आताही बाजारातून मागवले जात आहेत. बऱ्याच ठिकाणी शहरात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी फराळ करण्यासाठी शक्य तेवढा वेळ मिळत नाही. या धावपळीमध्ये नोकरी करणाऱ्या महिला घरी फराळ करतच नाहीत त्यामुळे बराच फराळाच्या वस्तू आचाऱ्याकडनं बनवून घेतल्या जात आहेत. सोसायटी आणि कॉलनी मध्ये आचार्यांचेही स्टॉलची आता लगबग वाढते आहे.
बाजारातील तयार फराळाचे दर
चकली 400 ते 450 रुपये
अनारसे 4 00 ते 450
पंचरत्न चिवडा 300 ते 350
शंकरपाळी 260 ते 280
पोहा चिवडा 320