आरोग्य -एच आय व्ही/ एड्स बाबत जनजागृती
बीड -परळी वैजनाथ – (महाराष्ट्र न्यूज कनेक्ट दि १९) जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय बीड व वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय परळी वैजनाथ यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार आयसीटीसी विभाग उपजिल्हा रुग्णालय परळी आणि लिंक वर्कर प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने दौनापूर येथे एच आय व्ही/ एड्स बाबत जनजागृती आणि तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यात शरद चव्हाण समुपदेशक यांनी सर्वांना एचआय व्ही/ एड्स बाबत माहिती दिली . हा आजार होण्यामागची प्रमुख चार कारणे यावर असणारा औषध उपचार तसेच हा आजार विषयी असलेले समाजातील गैरसमज ,संसर्गित व्यक्ती संदर्भात शासनाने तयार केलेला २०१७ चा कायदा, गावातील सर्व युवक युवती चे लग्नापूर्वी एच आय व्ही तपासणी करणे का गरजेचे आहे, या सर्व विषयावर सर्व गावकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
एच आय व्ही एड्स बाबत असणाऱ्या माहिती पुस्तकाचे वाटप करून सर्व लोकांना एच आय व्ही ची तपासणी करण्याचे आवाहन केले . तर अमोल गालफडे प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी गावकऱ्यांची एचआयव्हीची तपासणी केली. आजच्या शिबिरात एकूण 59 गावकऱ्यांनी स्वतःची एच आय व्ही तपासणी करून घेतली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी लिंक वर्कर लता आघाव व टी आय प्रकल्प ओआरडब्ल्यू प्रियंका पोटभरे यांनी अथक परिश्रम घेतले.