🔷 गत पंधरा दिवसात रेल्वे लुटीचा पाचवा प्रयत्न,
◾शिर्डी एक्सप्रेस लुटीचा मोठा प्रयत्न फसला
बीड/ परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज कनेक्ट- गत दोन ते तीन आठवड्यात चार गाड्या सिग्नल यंत्रणेत बिघाड करून लुटण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना ताज्या असतानाच काकीनाडा-नागरसोल शिर्डी एक्सप्रेस रविवार रोजी मध्यरात्री परळी जवळच असलेल्या वडगाव दादाहरी येथे सिग्नल मध्ये तांत्रिक बिघाड करून लुटण्याचा प्रयत्न रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे असफळ ठरला असून यामध्ये एका कोच मधील दोन महिलांचे दागिने चोरट्यानी लुटले असल्याची माहिती मिळत असून याबाबत अद्याप रेल्वे पोलिसात अधिकृत गुन्हा दाखल झालेला नाही.मात्र सातत्याने होतं असलेल्या अशा प्रकारच्या लुटीच्या प्रकारामुळे प्रवासी नागरिक मात्र आता घाबरून गेले आहेत.
(गाडी क्रमांक 17206) काकीनाडा ते नागरसोल धावणारी शिर्डी एक्सप्रेस परळी जवळील वडगाव दादाहरी येथे परळीचा दिशेने असलेल्या आउटर सिग्नलला चोरट्यानी तांत्रिक बिघाड करून उभी केली.अंदाजे 7-8 चोरट्यानी ही एक्सप्रेस लुटण्याचा प्रयत्न केला.ट्रेन मध्ये कर्तव्यावर असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे चोरट्यांचे रेल्वे लुटीचे मनसुभे उधळून लावत चोरट्याना पळवून लावले. यामुळे रेल्वे लुटीचा मोठा अनर्थ टळला.या घटनेत एका बोगी मध्ये 2 महिलांचे दागिने चोरट्याने लंपास केली असल्याच्या घटनेला दुजोरा मिळत असून या घटनेबाबत अध्याप रेल्वे पोलिसात कसलाही प्रकारचा गुन्हा नोंद करण्यात आला नाही.
रेल्वे मार्गाच सदरील घटनास्थळ हे सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून वारंवार या ठिकाणी घडत असलेल्या घटनेची दखल घेत लोहमार्ग पोलीस उप विभागीय पोलीस अधिकारी लोहकरे ,लोहमर्ग स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी यांनी घटनस्थळाला भेट देऊन सुरक्षाचे दृष्टीने योग्य त्या सूचना दिल्या. याप्रसंगी परळी लोहमार्ग पोलीस स्टेशन चे सहायक पो. नि. सोमनाथ वाघमोडे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पो. नि. प्रशांत गंभीरराव,रेल्वे सुरक्षा बलाचे सब इन्स्पेक्टर कांबळे,पोलीस अमलदार संजय भेंडेकर, परळी रेल्वे पोलीस ठाण्याचे क्राईम शाखेचे अनंत कांबळे. कोंडीराम सातपुते. आदी उपस्थित होते.
………………………………………………..
पोलिसांची माहिती.
काल रात्री 0130 वाजेचे दरम्यान ट्रेन न 17206 शिर्डी एक्सप्रेस वडगांव रेल्वे स्टेशन येण्यापूर्वी परळी दिशेने असलेल्या वॉटर सिग्नल मध्ये तांत्रिक बिघाड करून अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला असून आतील रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आसल्याने काही अनुचित प्रकार जास्त प्रमाणत घडून आलेला तक्रार दाराने कोठेही तक्रार दिलेली नाही.त्यामुळे अद्याप कोणाचीही तक्रार आलेली नाही त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही.सदरचे घटनास्थळ हे सोनपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येत असून लोहमार्ग पोलीस grp चे उप विभागीय पोलीस अधिकारी लोहकरे साहेब, लोहमर्ग स्था गु शा चे. यांनी घटनस्थळाला भेट दिली आहे.
सोमनाथ वाघमोडे
पी आय रेल्वे पोलीस स्टेशन,परळी वैजनाथ.
…………………………..
