परळीत सौ.किर्ती किरण धोंड यांच्या कडे उमलले दुर्मिळ हळदीचे फुल  

🔷 निसर्ग आणि निर्मिती
बीड- परळी वैजनाथ – एम एन सी न्यूज कनेक्ट प्रतीनिधी- हळद ही एक धार्मिक व आरोग्यावर अत्यंत गुणकारी वनस्पती आहे.अशा ह्या गुणकारी असलेल्या वनस्पती ला अपवादानेच फुल आल्याचे पहावयास मिळते.परंतु येथील अंबेवेस भागातील सौ.किर्ती किरण धोंड यांच्या घरी हळदीच्या झाडाला फुल आले असुन हे पाहण्यास अनेक जण भेट देत आहेत. हळदीचा वापर रोजच्या आहारात, औषधात, सौंदर्य प्रसाधनात,जैविक किटकनाशकात व पुजेत करण्यात येतो.हळद हे कंदवर्गीय असल्याने यास फुलोरा व परागीकरण याचा संबंध नसल्याने हळद या झाडाचा इतरांसारखा संबंध येत नाही.
  अनेकानेक वर्षा मधे एखाद्या वेळेस अतिशय अपवादात्मक परिस्थितीत हळदीच्या एखाद्याच झाडाला फुल पहावयास मिळते.अशातच सौ.किर्ती धोंड यांच्या घरी दीड वर्षा पुर्वी लावलेल्या हळदीच्या झाडाला फुल आलेले आहे. झाडाच्या बुंध्यापासुन निघालेले साधारण:8ते10 ईच उंचीचे वरुण पांढर्या रंगाचे हे फुल उमलताना दिसते.हिंदु पौराणिक कथांनुसार हे हळदीचे फुल उमलणे हे अतिशय शुभ सकल परिसरात सकारात्मक उर्जा निर्माण करणारे व यशस्वितेचे प्रतिक मानले जाते.
पौराणिक इतिहासातील नोंदीनुसार ज्या राज्यांची सेना युध्दावर गेली असेल त्या राज्यात जर हळदीचे फुल उमलले तर त्याला युध्द विजयाचे शुभ संकेती लक्षण म्हणून संबोधीलयाचया नोंदी आहेत. अलिकडच्या काळात वास्तु शास्त्रज्ञ या फुलाला लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून धन संचयाचया ठिकाणी ठेवल्याने धनवृधदी होत असल्याचे सांगतात त्याच बरोबर ज्या घरांमधे उच्च शिक्षण घेणारे व स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी असतात त्यांच्याकडे या फुलांचा उपयोग सरस्वती पुजनासाठी केल्यास हमखास यश प्राप्ती होत असल्याची मान्यता आहे.लक्ष्मी पुजनासाठी हे फुल मिळाल्यास अखंड वैभव लक्ष्मी प्राप्ती होत असल्याची  पौराणिक कथांमधे सांगण्यात आलेले आहे.
एकंदरीत निसर्गातील सकारात्मक ऊर्जेचे प्रतिक म्हणून यशप्राप्ती व धन संपदा वृद्धिंगत करण्यारे दुर्लभ यंञ म्हणून धार्मिक महत्व असलेले हे हळदीचे फुल आहे. अंबेवेस येथील सौ.किर्ती किरण धोंड यांच्या घरी हे अवघ्या दीड वर्षाच्या हळदीच्या झाडाला  दुर्मिळ असे हे फुल आंकटोबर महिन्यात आलेले आहे.