मैदानी स्पर्धेत महिला महाविद्यालयाचे यश

🔶  स्पर्धा – यश

बीड-परळी वैजनाथ-एम एन सी न्यूज नेटवर्क- येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत असते .याचाच प्रत्यय म्हणून
बलभीम कॉलेज बीड येथे संपन्न झालेल्या बीड झोन मैदानी स्पर्धेमध्ये या महाविद्यालयाची कु. अश्विनी रावसाहेब राठोड या विद्यार्थिनीने  ८०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सर्व तृतीय क्रमांक पटकावला .

या घवघवीत यशाबद्दल कै. लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय संजयजी देशमुख, सचिव आदरणीय रवींद्रजी देशमुख , कोषाध्यक्ष प्रा .प्रसादजी देशमुख व संस्थेच्या संचालिका तथा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्या देशपांडे मॅडम यांनी तिचे अभिनंदन केले आहे. या तिच्या यशात या महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख *डॉ प्रवीण दिग्रसकर* यांचे मोलाचे मार्गदर्शन व योगदान लाभले . या यशाबद्दल महाविद्यालयांतील सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही अभिनंदनाचा वर्षाव केला .