🔶 धार्मिक स्थळे🔺 तीर्थक्षेत्र
◾पालखी मिरवणूक भाविकांना दूध प्रसादाचे वाटप
बीड परळी – वैजनाथ-एम एन सी न्यूज नेटवर्क – ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात विशेष पूजा करण्यात आली. यानिमित्त श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने वाजत गाजत दक्षिणमुखी गणपतीला आहेर नेण्यात आला.
श्री वैद्यनाथ मंदिरात पालखी मिरवणुक काढण्यात आली व श्रीची आरती करण्यात आली. दरम्यान कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भाविकांना दूध प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव प्राध्यापक बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते श्री वैद्यनाथास पूजा करण्यात आली .यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्राध्यापक प्रदीप देशमुख, राजेश देशमुख, नागनाथराव देशमुख, अनिल तांदळे ,रघुनाथ देशमुख, नंदकिशोर जाजू, जगमित्र नागा मंदिराचे पुजारी श्री आवटी, यांच्यासह इतर विश्वस्त उपस्थित होते. पौर्णिमेनिमित्त आजपासून भाविकांच्या मानाच्या पूजा होत आहेत .एक महिनाभर अनेक पिढ्यापासूनच्या मानकरी यांना श्री वैद्यनाथ मंदिरात पूजेचा मान मिळतो.

