म न से  तिसरी यादी जाहीरःपरळी विधानसभा साठी अभिजित देशमुख

🔶 विधानसभा  निवडणूक २०२४ 

🔷 परळी विधानसभेसाठी पहिल्यांदाच दिला उमेदवार,
🔷 धनंजय मुंडे यांच्याविरोधात परळीतून अभिजित देशमुख
🔶 राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित माहीम मतदार संघातून उमेदवार

मुंबई – विधानसभा 2024 साठी आता विविध पक्षांचे उमेदवार याद्या बाहेर येत असून एक एक पत्ता खुलत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत 13 जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पालघर आणि ठाणे येथील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

परळी विधानसभा मतदारसंघातून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मनसेकडून अभिजित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. विशेष म्हणजे या यादीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

सोमवारी मनसेकडून राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. राजू पाटील कल्याण ग्रामीणमधून तर अविनाश जाधव ठाण्यातून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. वरळीत ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात लढत रंगणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याआधी  बाळा नांदगावकर (शिवडी, मुंबई), दिलीप धोत्रे (पंढरपूर), संतोष नागरगोजे (लातूर ग्रामीण), बंडू कुटे (हिंगोली विधानसभा), मनदीप रोडे (चंद्रपूर), सचिन भोयर (राजुरा), राजू उंबरकर (यवतमाळ) हे उमेदवार घोषित केले होते.