🔶 विधानसभा निवडणूक २०२४ 🔷 २३३ परळी विधानसभा
◾ कोणत्याही शक्तीप्रदर्शनाशिवाय उमेदवारी अर्ज दाखल, पंकजाताईंची सुचकाची भूमिका
बीड -परळी वैजनाथ – कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भगिनी तथा विधान परिषद सदस्य आ. पंकजाताई मुंडे, माजी खा. डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्यासह परळी मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या सोबतीने आपला उमेदवारी अर्ज आज परळी येथील तहसील कार्यालयात दाखल केला आहे.
धनंजय मुंडे यांनी साध्या पद्धतीने, कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता दुपारी 1 वाजेच्या दरम्यान आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, यावेळी स्वतः आ.पंकजाताई मुंडे यांनी सुचकाची भूमिका निभावली. अर्ज दाखल करण्यापूर्वी नाथरा येथील निवासस्थानी धनंजय मुंडे यांचे त्यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे यांनी औक्षण करून आशीर्वाद दिले. यावेळी सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे व धनंजय मुंडे यांच्या ज्येष्ठ भगिनी शकुंतलाताई केंद्रे या उपस्थित होत्या.
अर्ज भरून बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्रकाराची संवाद साधला यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आपण कोणतीही निवडणूक हलक्यात घेत नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असो, लोकसभा असो किंवा विधानसभा असो, प्रत्येक निवडणूक आपण पूर्ण ताकतीने लढत असतो; त्यामुळे यशाची हमखास खात्री मिळते. विरोधकांना कोण उमेदवार मिळेल किंवा आपल्या विरोधात कोण उभे असेल याबाबतची काळजी न करता मी आजवर केलेली कामे आणि माझ्या मनात असलेले विकासाचे व्हिजन घेऊन लोकांमध्ये जाणार आहे आणि स्वतःसाठी मतदान रुपी आशीर्वाद मागणार आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.
यावेळी विधानपरिषद सदस्य आ.पंकजाताई मुंडे, माजी खा. डॉ.प्रीतमताई मुंडे, माजी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, माजी आ.आर टी देशमुख, रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण, अजय मुंडे, वाल्मिक अण्णा कराड, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, कल्याणराव आखाडे, गोविंदराव देशमुख, शिवाजी सिरसाट, विजय वाकेकर, वैजनाथराव सोळंके, भाजप तालुका प्रमुख, सतीश मुंडे, बाबुराव मेनकुदळे, बाजीराव धर्माधिकारी, जाबेर खान पठाण, शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, ऍड.गोविंदराव फड, प्रा.विनोद जगतकर, राजाभाऊ औताडे, अभय मुंडे, रामेश्वर मुंडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ.प्रज्ञाताई खोसरे, दीपक देशमुख, सूर्यभान मुंडे, प्रा. मधुकर आघाव, विश्वाम्भर फड, माऊली तात्या गडदे, शिवाजीराव गुट्टे, शरद राडकर, राजा भैय्या पांडे, सत्यजित सिरसाट, श्रीहरी मुंडे, निळकंठ चाटे, पवन मुंडे, वसंत राठोड, वैजनाथ माने यांसह महायुतीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
🔺धनंजय मुंडे यांचे आत्तापर्यंत सर्वच कार्यक्रम शक्तिप्रदर्शनासह गर्दीचे विक्रम मोडणारे असतात मात्र यावेळी प्रथमच साधेपणाने त्यांनी अर्ज दाखल केला. साधेपणाने अर्ज भरणार असतानाही मतदारसंघातील जवळपास 5000 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
🔺 धनंजय मुंडेंनी पिवळ्या रंगाचा कुडता घातला होता, मागील निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरतानाही त्यांचा याच रंगाचा कुडता होता.