🔶 विधानसभा निवडणूक २०२४ 🔷 निवडणूक आयोग 🔷 एक्झिट पोल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय निवडणूक आयोगाने १३ ते २० नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रासह १६ राज्यांतील निवडणुका होईपर्यंत एक्झिट पोलवर बंदी घालणारा आदेश गुरुवारी जारी केला.
दरम्यान या कालावधीत कोणत्याही प्रिंट किंवा टीव्ही मीडियाला कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल छापता वा प्रसारित करता येणार नाहीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. ही बंदी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत लागू राहणार आहे.