राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा : सहभाग ७२० खेळाडू

संग्रहित छायाचित्र, साभार महाराष्ट्र खो-खो असोसिएशन

🔶 राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा :

धाराशिव-सुवर्णमहोत्सवी ५० वी कुमार व मुली राज्यस्तरीय खो-खो अजिंक्यपद व संघ निवड चाचणी स्पर्धेचे स्पर्धेचे आयोजन धाराशिव येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र खो-खो संघटना व धाराशिव जिल्हा खो-खो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने संघ निवड चाचणी स्पर्धेचे २७ ते ३० ऑक्टोबरदरम्यान आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर होत आहे. या स्पर्धेत राज्यातील २४ कुमार व २४ मुलींच्या संघातून एकूण ७२० खेळाडू मैदानात उतरतील.

सकाळी आणि सायंकाळी प्रकाशझोतात खेळवले जाणारे या स्पर्धेसाठी ३ मैदाने तयार करण्यात आली आहेत. खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था संघटनेने केली. जवळपास १० हजार प्रेक्षकांना बसण्यासाठी भव्य गॅलरी बनवली आहे.

या स्पर्धेतून निवडलेला संघ २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. प्रशांत कदम (सातारा), रमेश नांदेडकर (नांदेड), संदीप चव्हाण (पुणे) व भावना पडवेकर, (ठाणे) हे निवड समिती सदस्य आहेत.