मराठवाडा, मध्य महाराष्ट्रा मध्ये विजेच्या लकलखाटा सह पावसाचा अंदाज

संग्रहित छायाचित्र

🔷 हवामान अंदाज- दिवाळीत पाऊस
🔺 सोलापुरात ३५.८ अंश तापमानाची नोंद

मुंबई – राज्यच्या अनेक भागात ऑक्टोबर हिट चटका जोरदारपणे जाणवत आहे थंडीचा आगमन अजून व्हायचं आहे मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यात ऑक्टोबर हिट ने आपलं रौद्ररूप दाखवला आहे.दरम्यान राज्यात अनेक भागात ऑक्टोबर चा चटका जाणवत असतांना कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाच्या शक्यतेचा इशारा हवामाने विभागाने दिला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
मार्च एप्रिल मधील उष्णता सदस्य सध्या काही भागात परिस्थिती आहे दिवस रात्र पंखे भिरभिरत आहेत.

राज्यातील उष्ण तापमान असणारे अकोला आणि वर्धा येथील तापमान ३५ अंश सेल्सिअसवर होते. तसेच, अमरावती, नागपूर, परभणी, वाशीम, यवतमाळ येथे ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे