🔺रेल्वे प्रवाशांचा क्यूआर कोड बुकिंग साठी मोठा प्रतिसाद.
नागपूर : रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटरवर तिकीट काढण्याचे दिवस आता इतिहास जमा होत आहेत.नवीन तंत्रज्ञानच्या आधारे रेल्वे प्रवासी क्यूआर कोडच्या माध्यमातून झटपट तिकीट विक्रीचा व्यवहार करण्याला प्राधान्य देत आहेत.गत सुमारे महिन्याभराच्या काळात क्यूआर कोडच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांनी सुमारे तीन कोटी रुपयांच्या तिकिटांची खरेदी केली आहे.
रेल्वे स्थानकावर असलेल्या तिकीट काउंटरसमोर लांबच लांब गर्दीत उभे राहून तिकीट काढण्यास आतापर्यंत पर्याय नसल्याने प्रवासी रांगेत ताटकळत उभे राहत होते. परंतु काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकीट खरेदी करण्यासाठी क्यूआर कोडचा पर्याय उपलब्ध करून दिला. त्याला रेल्वे प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गर्दीत आणि रांगेत उभे राहून तिकीट घेण्याऐवजी ग्राहक कोड स्कॅन करून पाहिजे त्या ठिकाणचे रेल्वे तिकीट विकत घेत आहेत.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहिती नूसार ऑक्टोबर २०२४ पर्यंत नागपूर विभागात एक लाख, ५४ हजार प्रवाशांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून अनारक्षित तिकीट विकत घेतले.त्यामुळे रेल्वेच्या तिजोरीत एक २ कोटी, २३ लाख, ५५ हजार ९३६ रुपये जमा झाले. दुसरीकडे २६,४८९ प्रवाशांनी १ कोटी, ४९ लाख, ५८ हजार रुपयांचे विविध श्रेणीचे आरक्षित तिकीट खरेदी केले.