🔷 येणारे चार-पाच दिवस रुग्णालयात विश्रांती
पुणे : राज्यात चालू असलेल्या विधानसभा निवडणूक च्या दरम्यानच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तेथे त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली असून, सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या हृदयात रक्ताच्या गाठ निर्माण झाल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली असून पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयात राहावे लागणार आहे.
कार्यकर्त्यांनी कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन फोन करू नये तसेच रुग्णालयात येऊ नये असेही कळवण्यात आले आहे. वंचित बहुजन पार्टीच्या एक्स अकाउंट वरही याबाबतची माहिती वंचित च्या द्वारे समाज माध्यमावर देण्यात आली आहे.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांची टीम उपचार करत आहे. कार्यकर्त्यांनी,कोणीही हॉस्पिटलबाहेर येऊ नये. आपल्या मतदारसंघात रहावे, असे आवाहन वंचितचे युवा आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केले आहे.
