🔶 २०१९ चे शपथपत्रात ३ तर २०२४ शपथपत्रात ५
बीड /परळी वैजनाथ-(एम एन सी न्यूज नेटवर्क) २३३ विधानसभा परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात पत्नीसह ५ अपत्ये अवलंबित असल्याचे नमूद केले आहे. मात्र २०१९ चे शपथपत्रात त्यांनी पत्नीसह तीन अपत्ये असल्याचा उल्लेख केला होता.
विधानसभा निवडणुका लढवणाऱ्याचे शपथपत्रात संपत्ती, आपल्यावर अवलंबित व्यक्ती,दाखल गुन्हे, आदीची माहिती भरून निवडणूक विभागाला शपथपत्र सादर करावयाचे बंधनकारक आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा मतदार संघातील ४०९ उमेदवारांनी ५०६ अर्ज दाखल केले होते, त्यातील ३३ उमेदवारांचे ६१ अर्ज विविध आणि तांत्रिक कारणामुळे बाद झाले आहेत. मात्र आयोगाला दिलेल्या शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी पाचअपत्ये दाखविले आहेत. २०१९ च्या शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी पत्नी राजश्री मुंडे कन्या वैष्णवी मुंडे, जान्हवी मुंडे, आणि आदिश्री मुंडे या तीन अपत्यांचा उल्लेख केलेला होता. मात्र २०२४ च्या शपथपत्रात त्यांनी पाच आपत्यांचा उल्लेख केला असून त्यामध्ये सिशीव मुंडे आणि शिवानी मुंडे यांची नावे वाढवली आहेत.
🔶 विधानसभा २०१९ शपथपत्र
वैष्णवी मुंडे, जान्हवी मुंडे, आदिश्री मुंडे या तीन अपत्यांची नावे शपथपत्रात होती.
🔶 विधानसभा २०२४ शपथपत्र
शिवानी मुंडे, सिशिव मुंडे,वैष्णवी मुंडे, जान्हवी मुंडे, आदिश्री मुंडे ही पाच अपत्यांची नावे शपथपत्रात आहेत.
