कोकण रेल्वेचे बिगर पावसाळी वेळापत्रक आजपासून

🔷 कोकण रेल्वेचे वेळापत्रक

रत्नागिरी : पावसाळ्यातील हवामान आणि परिस्थिती पाहता कोकण रेल्वेवर धावणाऱ्या गाड्यांच्या वेगात बदल करण्यात आलेला असतो. त्याला पावसाळी वेळापत्रक म्हणतात. त्याची मर्यादा 31 ऑक्टोबर रोजी समाप्त होत आहे. १ नोव्हेंबर पासून बिगर पावसाळी कोकण रेल्वेचे वेळापत्रक नुसार गाड्या धावतील.

कोकण रेल्वेचे वेळापत्रक उद्या दिनांक १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. उद्यापासून नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्या धावणार आहेत. कोकणातील सतत धार पावसामुळे वेळापत्रक बदलण्यात येते. कोकण रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या पावसाळी वेळप्रत्रकानुसार चालविण्यात येत असतात. हे पावसाळी वेळापत्रक ३१ ऑक्टोबर रोजी समाप्त होत आहे, उद्या दिनांक १ नोव्हेंबर पासून बिगर पावसाळी Non Mansoon वेळापत्रकानुसार सर्व गाड्या चालविण्यात येणार आहेत.

हा बदल दरवर्षी होत असला तरी याकडे लक्ष न दिल्याने अनेकदा काही प्रवाशांना गाडी चुकल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या वेळापत्रक बदलाकडे लक्ष देऊन आपल्या प्रवाशाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.