🔺प्रवास -सण -उत्सव
पनवेल– नांदेड दिवाळी सणासाठी चाकरमानी मंडळी मराठवाड्यात आपल्या गावाकडे आली आहेत यांची परतीच्या प्रवासात होणारे संभाव्य गर्दी लक्षात घेता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांसाठी पनवेल ते नांदेड दरम्यान विशेष एक्सप्रेस गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची निर्माण होणारी अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होईल. या गाडीमुळे अनेकांना आरक्षणही उपलब्ध होईल त्यामुळे प्रवास करणाऱ्यासाठी हि बातमी महत्वाची आहेच.
🔺पनवेल ते नांदेड विशेष गाडी क्रमांक 07636🔺
पनवेल ते नांदेड सुटणाऱ्या गाडीचा क्रमांक 07636 असून , हि ट्रेन पनवेल येथून 7 नोव्हेंबरला दुपारी 4:30 वाजता सुटणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी 8 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता नांदेड येथे पोहोचणार आहे.
तसेच नांदेड ते पनवेल गाडी 6 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता नांदेड येथून सुरू होईल, आणि 7 नोव्हेंबरला दुपारी 2:45 वाजता पनवेल येथे येईल.
🔷 या स्थानकांवर थांबेल- हि विशेष गाडी कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी, पूर्णा या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार असून त्यामुळे अनेक प्रवाश्यांच्या प्रवासातील समस्या दूर होणार आहेत. दिवाळीच्या सणाच्या वेळी होणाऱ्या प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीकमी होण्यास ही गाडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.