परळी विधानसभा निवडणूक रिंगणात अकरा उमेदवार

🔶🔶 बीड जिल्हा  विधानसभा २०२४ 🔶 १३९  उमेदवार रिंगणात

बीड – प्रतिनिधी-संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदार संघात आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. यामध्ये प्रमुख लढत ही धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख अशी थेट लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातून एकूण उमेदवारी अर्जा पैकी केवळ अकरा अर्जाच शिल्लक राहिले आहेत. प्रबळ दावेदार प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघाची लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांच्यातच थेट होणार आहे.

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली यादरम्यान वै ठरलेल्या 377 उमेदवारांपैकी २३८ उमेदवारांनी माघार घेतली आहे आता सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये 139 उमेदवार रिंगणात

अर्ज मागे घेतल्यानंतर आता गेवराई मतदार संघात 21, माजलगाव मतदार संघात 34, बीड 31, आष्टी 17, केज 25, परळी 11 याप्रमाणे उमेदवारी अर्ज कायम असून सहा मतदार संघात 139 उमेदवार आता नशीब आजमावणार आहेत.

🔶 परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

1. धनंजय पंडितराव मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार)

2. राजेसाहेब किशनराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

3. धोंडीराम लक्ष्मण उजगरे (बहुजन समाज पक्ष)

4. केदारनाथ वैजनाथ जाधव (पीजेन्टस् अॅन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया)

5. भागवत बबनराव वैद्य (विकास इंडिया पार्टी)

6. साहस पंढरीनाथ आदोडे (मराठवाडा मुक्ती मोर्चा)

7. अल्ताफ खाजामिया सय्यद (अपक्ष)

8. दयानंद नारायण लांडगे (अपक्ष)

9. राजेसाहेब उर्फ राजाभाऊ सुभाष देशमुख (अपक्ष)

10. शाकीर अहमद शेख, (अपक्ष)

11. हिदायत सादेकअली सय्यद (अपक्ष)