लक्ष्मीपूजन मुहूर्तावर घेतल्या भेटीगाठी; व्यापारी बांधवांतून सकारात्मक प्रतिसाद

🔶 भेटीगाठी; व्यापारी बांधवांच्या

बीड-परळी वैजनाथ – परळी शहरातील व्यापार इतर ठिकाणी स्थलांतरित होत आहे. त्यात परळी मतदार संघावर सत्ता गाजवणाऱ्या लोकांचा निष्क्रिय कारभार दिसून येतो. परळीचा व्यापार बाहेर पाठविणारा आमदार हवा की टिकविणारा हवा असा प्रतिप्रश्न युवक नेते राजेभाऊ फड यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना केला. दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी परळीतील विविध व्यापारी बांधवांची भेट घेऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. तद्नंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना ते बोलत होते.

युवक नेते राजेभाऊ फड यांनी दीपावलीच्या लक्ष्मीपूजन दिवशी परळी शहरातील व्यापारी बांधवांच्या भेटी घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या. मागील काळात बाजार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी उत्कृष्ठ काम केलेले असल्याने व्यापारी बंधवांशी त्यांचा घनिष्ठ स्नेह आहे. सर्वांना शुभेच्छा देत असताना त्यांच्याशी प्रेमाची आणि आपुलकीची अल्प चर्चा झाली.

व्यापारी बांधवांनी आपले गाऱ्हाणे खाजगीत बोलून दाखवत असताना आणि व्यक्त होतांना बोलून दाखवले की, परळीच्या व्यापाराला अजिबात संरक्षण नाही. इतर शहरातील व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढत असताना परळीतील व्यापार बाहेर का जातो आहे? याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. आपल्या भागाचा व्यापार वृद्धिंगत व्हावा यासाठी आणि परळीला भयमुक्त करण्यासाठी मी कठीबद्ध असल्याचे राजेभाऊ फड यांनी वचन दिले. त्याचबरोबर या भेटीगाठी होत असताना पत्रकारांशी संवाद झाला विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.