पुष्पा २ द-रुल पोस्टर प्रदर्शित

🔶 मनोरंजन- चित्रपट टॉलीवूड

अल्लू अर्जुन आणि फहाद या सोबतच रश्मिका मंदाना यांची भूमिका असलेला पुष्पा याने प्रचंड अशी कमाई बॉक्स ऑफिस वर केली, उत्पन्नाचे अनेक रेकॉर्ड या चित्रपटांना मोडले. आता याचाच पुढील भाग असणारा पुष्पा- २ द रूल पुढील महिन्यात रिलीज होतो आहे.

पुष्पा चित्रपट त्यातील गीत आणि वेगळ्या विषयाच्या हाताळणीमुळे आणि एकूणच दिग्दर्शनातील कौशल्यामुळे लोकप्रिय झाला होता. पुष्पा२ – द रूल हा सिक्वल 5 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होतो आहे. प्रदर्शनापूर्वीच त्याचे पब्लिसिटी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून अल्लू अर्जुन आणि फहाद यांच्या मुख्य इमेज या पोस्टवर दिसून येत आहेत. फहाद हे दक्षिण भारतातील दमदार असे अभिनेते असून ते त्यांच्या डोळ्या द्वारेच अधिक काही बोलून जातात. फहाद यांच्या जादू करणाऱ्या डोळ्यां द्वारे पुष्पा २ चा नवीन भाग २ प्रेक्षकांना आवडेल. नुकतेच प्रदर्शित करण्यात आलेल्या लाल रंगातील आकर्षक पोस्टरलाही सिने रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.