आतापर्यंत २८१ कोटींची मालमत्ता  तर गेल्या महिन्याभरात पुण्यात सुमारे तीन कोटीचा दारू साठा आणि वाहने केली जप्त

विधानसभा निवडणूक २०२४ 

मुंबई : राज्यातील अनेक राज्य रस्त्याने, महामार्गावर वाहनातून कोट्यावधी रुपयाची वाहतूक केली जात असल्याचे  तपासणी नाक्यावर आणि पोलिस तपासात आढळून एत आहे.एकूणच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत राज्यभरातून सी- व्हिजिल अॅपवर एकूण २ हजार ८३३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही तक्रारींचा निराकरण  केल्याचं प्रशासन म्हणत मात्र बऱ्याच ठिकाणी तक्रारीचे निवारण होत नसल्याच्या चर्चा दिसून येत आहेत.

सुमारे  २ हजार ८१९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. दरम्यान, या कालावधीत राज्याच्या विविध भागातून तब्बल २८१ कोटी ७८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. एकूणच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महामार्ग हे पैसे वाहतुकीचे अमली पदार्थाचे आणि दारू वाहतुकीचे मुख्य मार्ग बनले आहेत .

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यात पोलिसांच्या वाहनातून काही जिल्ह्यात अवैध्य रोख रकमेची वाहतूक होत असल्याबद्दल चा आरोप केला होता त्यानंतर काही ठिकाणीच तपासणी नाक्यावर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्याचे दिसून आलं मात्र परिस्थितीत सुधारणा मात्र नाही.