🔺विधानसभा निवडणूक २०२४ – 🔺अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई-वृत्तसंस्था-राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्याच्या पोलिस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वीच्या पोलिस महासंचालक पदी असलेल्या रश्मि शुक्ला यांची महाविकास आघाडीच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पोलिस महासंचालकपदावरून पायउतार केले .
नव्या महासंचालकाच्या नियुक्तीसाठी तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे पॅनल नेमून राज्यातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याची मंगळवार दुपारपर्यंतपोलिस महासंचालकपदी नियुक्तीचे आदेशही आयोगाने मुख्य सचिवांना दिले होते. संजय वर्मा हे १९९० च्या आयपीएस बॅचचे आहेत. प्रभारी पोलिस महासंचालक विवेक फणसळकर यांच्याकडून वर्मांनी सूत्रे स्वीकारली. संजय वर्मा यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास केला होता.