पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे तपासणी ; शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

विधानसभा निवडणूक  २०२४

मुंबई :वृत्तसंस्था- सध्या राज्यात विधान सभेची धुमशन चालू आहे. नुकताच या निवडणुकीत राज्यात पोलिसांच्या आणि सरकारी वाहनांमधून पैसे नेले जात असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला होता. त्यानुसार निवडणुकीच्या काळात प्रत्येक सरकारी वाहनाची तपासणी करण्याचे स्पष्ट आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पोलिसांसह अन्य सरकारी वाहनांचीही तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

या संदर्भात माध्यमं प्रतिनिधिनी  विचारले असता चोक्कलिंगम यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘ निवडणूक काळात सर्वच वाहने ‘तपासण्याचे अधिकार तपासणी पथकांना असतात. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तक्रारी केल्यानंतर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा सूचना केली आहे. त्यानुसार सर्वांची वाहने तपासण्यात येतील. यात कुणी कुचराई केली तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.