तीर्थयात्रा पर्यटन
नांदेड : संत निरंकारीच्या ७७ व्या वार्षिक समागम कार्यक्रमासाठी होणारी गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने नांदेडहून पानीपतला जाण्यासाठी विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. गाडी क्रमांक ०७४३१ नांदेड ते पानीपत विशेष गाडी नांदेडहून १४,१९ गुरुवारी दि. नोव्हेंबर रोजी आणि मंगळवारी सकाळी ५.४० वाजता सुटणार आहे. ही गाडी पूर्णा, परभणी, सेलू, जालना, औरंगाबाद,मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, पलवल, न्यू दिल्ली, भोदावल, माजरी मार्गे पानीपत येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १३.४० वाजता पोहोचणार आहे.
गाडी क्रमांक ०७४३८ पानीपत ते नांदेड विशेष गाडी : गाडी संख्या ०७४३८ ही विशेष गाडी पानीपत येथून दि.१५ आणि २० नोव्हेंबरला शुक्रवारी आणि बुधवारी दुपारी १५.३५ वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गाने नांदेड येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता पोहोचेल. या गाडीत स्लीपर, वातानुकुलीत आणि जनरल असे २४ डब्बे असतील. या विशेष गाडीचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन दमरे नांदेड विभागाने केले आहे.