शरद पवार यांचा आज मराठवाड्यात झंजावात

विधानसभा निवडणूक  २०२४

🔷 उदगीर- सुधाकर भालेराव, 🔷 परळी वैजनाथ- राजेसाहेब देशमुख, 🔷  बीड संदीप क्षीरसागर 🔷 आष्टी- महेबूब शेख –  चार उमेदवार  चार सभा

बीड/प्रतिनिधी : काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ) चे अध्यक्ष महाविकास व इंडिया आघाडीचे प्रमुख नेते खा.शरदचंद्र पवार हे आज दि. ९ नोव्हेंबर रोजी बीड,उदगीर, परळी वैजनाथ आणि आष्टी येथे सभा घेणार आहेत. त्यामुळे बीड आणि लातूर जिल्ह्याच्या राजकारणाची सर्व समीकरणे बदलणार आहेत. आपल्या सर्व उमेदवारांसाठी पवार हे वारं फिरवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.दरम्यान या विजयी सभेचे साक्षीदार व्हा असे आवाहन. संदीप क्षीरसागर, राजेसाहेब देशमुख, सुधाकर भालेराव आणि महेबूब शेख  यांनी केले आहे.

पडत्या काळात साथ देणाऱ्या संदीप क्षीरसागरांसाठी पवारांनी बीडमध्ये फिल्डींग लावली सभास्थळाची पाहणी आ. संदीप क्षीरसागर यांनी शुक्रवारी सभास्थळी जावून स्वतः पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला. सभेचे नियोजनात कसलीही कसर राहणार नाही याची दक्षता स्वतः आ. संदीप क्षीरसागर घेतली आहे.

खा. शरदचंद्र पवार यांची शनिवारी बीड शहरात छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर जाहीर सभा होणार आहे. तर परळी वैजनाथ येथे मोढा मैदानवर आष्टी येथे  तर उदगीर येथे या सभा होत आहेत सभेला
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाड च्या उमेडवरणी केले आहे.