धनंजय मुंडे यांचा नाशिक जिल्ह्यात प्रचाराचा धडाका

महाराष्ट्र #विधानसभा_निवडणूक_2024

नाशिक – जिल्ह्यात कळवण- सुरगणा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन पवार यांच्या प्रचारार्थ सुरगणा येथे तसेच सिन्नर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे उमेदवार आ. माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारार्थ नांदूर शिंगोटे येथे तर आयोजित सभेस संबोधित केले.

नांदूर शिंगोटे येथे साकारण्यात आलेल्या स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मारकास अभिवादन केले.आदरणीय अजितदादांच्या विकासाच्या व्हिजनच्या सोबतीला हे दोन्हीही मतदारसंघ उभे राहतील व या दोनही उमेदवारांना भरगोस मतांनी विजयी करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.