विधानसभा निवडणूक २०२४ –
फोजिया खान, खा. रजनी पाटील खा. बजरंग सोनवणे यांची उपस्थिती
बीड- परळी वैजनाथ- राष्ट्रवादी पक्ष फोडण्यासाठी तिघांचे मुख्य प्रयत्न होते त्यांची नावे मी सांगण्याची आवश्यकता नाही,पालकमंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली; परळी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आयोजित प्रचार सभेत कोणाचेही नाव न घेता घणाघात.
शहरातील मोढा मैदान येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भाषणात पुढे बोलताना पवार म्हणाले की पंडितांना मुंडे हे माझ्याकडे आले होते, त्यांनी मला त्यांच्या मुलाला संधी देण्याची विनंती केली आम्ही ती मान्य करत विरोधी पक्ष नेते, आमदार,आणि मंत्रिमंडळात संधी देते जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली. सत्ता हे जनतेचे कामकाज आणि सेवेसाठी असते पण इथं सत्तेचा उपयोग त्रास देण्यासाठी झाल्याचा आता लक्षात येत आहे. इथल्या नेत्याच्या डोक्यात सत्ता गेली असून ते परळीतील आणि जिल्ह्यातील नागरिकांचे काम आणि सेवा करण्या ऐवजी त्रास देण्यास सुरुवात केली आहे. याचे प्रचंड दहशत निर्माण केली अनेक व्यापाऱ्यांना व्यापार करता येत नाही अशी येथील परिस्थिति आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे काम केले असे नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी यावेळी टीका केली.
एके काळी या जिल्ह्याने सर्व आमदार निवडून देण्याचे काम केले. दिवंगत रघुनाथजी मुंडे, माजी नगराध्यक्षा राधाबाई यांनी येथे विकासाची मोठी कामे केली आहेत आणि जनसेवा केली आहे. आता आम्ही या मतदारसंघात परिवर्तन आणण्यासाठी राजसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे त्यांना संधी द्या असे शरद पवार यांनी यावेळी आवाहन केले. या प्रचार सभेस भूषण सिंह राजे होळकर कॉम्रेड एडवोकेट अजय बुरांडे, राजेश देशमुख , फोजिया खान, खा. रजनी पाटील खा. बजरंग सोनवणे यांचीही भाषणे झाली.
प्रचार सभेस भूषणसिंह होळकर जीवनराव गोरे खासदार बजरंग सोनवणे खासदार रजनी पाटील फौजिया खान डॉक्टर नरेंद्र काळे, राजाभाऊ फड, राजेश देशमुख, सुनील गुट्टे, सुदामती गुट्टे, अजय बुरांडे, प्रभाकर वाघमोडे, शहराध्यक्ष अडवोकेट जीवनराव देशमुख, देवराव लुगडे, सहकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार यांचे आवाहन-
परळीतील गुंडगिरी, दहशत संपवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी परळीकरांना केले. मुंबईत पंडितअण्णा व धनंजय आले होते. ‘हा माझा मुलगा आहे, त्याच्यावर लक्ष ठेवा,’ म्हणत म्हणत पंडित अण्णांनी अडचणीत मदत मागितली. त्यानंतर त्यांना पक्षात घेत संधी दिली. लोकांची सेवा करता यावी म्हणून संघटनेत जबाबदारी दिली. विधान परिषदेत, केले. मंत्रिमंडळात सहकार्य केले. जे जे करता येईल ते ते मी केले; पण त्यांनीच पक्ष फोडण्यास हातभार लावला.
सत्ता डोक्यात येऊ द्यायची नसते. परळीत सर्वच व्यवसाय-धंद्यांचे नियंत्रण ठरावीक लोकांच्या हाती आहे. दादागिरी, गुंडगिरीमुळे दुकान- धंदा करणे अवघड झाले, याचा फटका कष्टकरी श्रमिकांना बसतो.लोकांना होणारा त्रास थांबला पाहिजे, यासाठी एकत्र येऊन शक्ती उभी करा. जिल्ह्यातील गुंडगिरी थांबावा, असे आवाहन पवार यांनी केले.
रघुनाथ मुंडेंचा मृत्यू बऱ्याच दिवसांनी परळीत आल्याचा उल्लेख करीत शरद पवार यांनी काही आठवणी सांगताना एकेकाळी येथील रघुनाथराव मुंडे हे जिवाभावाचे सहकारी होते. माणसे जोडणे हा त्यांचा स्वभाव होता. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू कशामुळे झाला, हे कोडे आपल्याला अद्याप समजलेले नसल्याचे पवार म्हणाले.