नवी मुंबईहून पालघरकडे निघालेल्या व्हॅनमध्ये आढळली रक्कम
मुंबई- पालघर-(वृत्तसंस्था ) राज्यात सर्वत्र निवडणुकीची धूम सुरू झाली असून निवडणूक आयोग आणि पोलीस तपासणी नाक्यावर मोठ्या रकमेची वाहतूक करतांना वाहने ताब्यात घेतली जात आहेत. नुकतीच नवी मुंबई कडून पालघर जिल्ह्यातील विक्रमगडकडे निघालेल्या एका व्हॅनमधून पोलिसांचे निगराणी आणि भरारी पथकाने ३ कोटी ७० लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. या मोठ्या रोख रकमेबद्दल चालक आणि सोबतच्या सुरक्षा रक्षकाकडे विचारणा केली असता रोकडीचा तपशील अथवा माहिती देण्यात दोघेही असमर्थ ठरले.
त्यामुळे त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलीस सूत्रांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी व्हॅनला थांबवून गाडीची तपासणी केली, आढळून आलेल्या त्यात रोख रक्कमे बद्धल या वेळी पोलिसांनी रोख रकमेचा तपशील आणि त्यासंबंधीची वैध कागदपत्रे मागितली असता चालक आणि सोबतच्या सुरक्षा रक्षकाला त्याबाबत माहिती देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी व्हॅनसह ही रोकड जप्त केली. याजप्त रकमेच्या संदर्भात आयकर विभाग आणि निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती – देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक दत्ता किंद्रे यांनी सांगितले.