विधानसभा २०२४ -निवडणूक आयोग
मुंबई – विधानसभा निवडणूक आणि मतदानाची तारीख जवळ येत चालली आहे तसं रोख रक्कम, सोने, मद्य याची बेकायदा वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असून नुकताच मुंबईमधील पश्चिम उपनगरातील दहिसर विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या सर्वेक्षण पथकाने सुमारे दोन किलो सोने जप्त केले आहे. एकूणच विधानसभा रंगत आता वाढत असून मतदारांना आकर्षित करण्यासाठीच्या अमिशाच्या वस्तू मध्य दागिने, सोने आणि रोख रक्कम या प्रकारच्या वस्तूंचं सर्रास वापर केला जातो. या सर्व प्रकारावर निवडणूक आयोगाची पथके लक्ष ठेवून आहेत. ज्या वाहनांमध्ये तपासणी करून रोख रक्कम आणि मुद्देमाल सोने आदि आढळून येत आहे अशी रक्कम हजारो कोटीच्या घरात जाऊ शकते.
दहिसर विधानसभा क्षेत्रात केंद्रीय खर्च निरीक्षक सौरभ कुमार शर्मा यांच्या सूचनेनुसार आणि निवडणूक निर्णय अधिकारी शितल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित तपासण्या सुरू आहेत. यावेळी अवधूत नगर दहिसर मधील अवधूत नगर भागात निवडणूक आयोगाच्या सर्वेक्षण पथकाला सुमारे 1.43 कोटी रुपये किमतीच्या 1.95 किलो बेहिशोबी सोन्याची वाहतूक होत असल्याचा आढळून आलं. कार्यवाही करत या पथकाने हे सोना जप्त केले आहे

