अकोला जिल्ह्यात अवैध दारूपूर;पोलिसांची कारवाई

Crime -क्राईम, अवैध दारु – निवडणूक २०२४ 

३२ लाख  रुपयांची दारु नष्ट

अकोला : मतदाराना मोफत दारू  मटन पार्ट्या ही ही साधी  पद्धत असून विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्हाभरात अवैध दारूचा महापूर आला असल्याचे  दिसत आहे. तर दारूची निवडणुकीच्या कालावधीत जादा दराने विक्री होते . या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या निर्देशानुसार पोलिस यंत्रणेने ३२ लक्ष रुपये किमतीची तब्बल २५ हजार लिटर दारू जप्त करून ती नष्ट केली आहे.  निवडणुकीच्या कालावधीत अवैध दारू विक्रीला पेव फुटते. जिल्हाभरात देशी-विदेशी दारूचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांकडूनच काही बारमालक महामार्गावरील धाबामालक अवैधरीत्या दारूचा साठा करून ठेवतात. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवैध दारू सहज उपलब्ध होते. अशा ३२ लक्ष रुपयांची दारु नष्ट पोलिस यंत्रणेने जिल्हाभरात राबविलेल्या धाडसत्रात देशी, विदेशी, हातभट्टी, सडवा मोहमाच अशा प्रकारे ३२ लक्ष २० हजार रुपयांची दारू जप्त करून ती नष्ट करण्यात आली.

जिल्हाभरात अवैध दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. निवडणुकीचा कालावधी असल्यामुळे तळीरामांची चंगळ होत
असली तरी यामुळे गावातील सलोखा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पाहून जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई चा इशारा दिल असून याप्रकरणी ३९६ केसेस दाखल केल्याअसून, संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ९३ ब प्रमाणे सुमारे ७५ जणांवर  कारवाई केली आहे.