🔶 विधानसभा २३३ परळी मतदारसंघ
🔶 गाडेपिंपळगाव येथे कॉर्नर सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद
परळी वैजनाथ (दि. 12) – महाविकास आघाडीला विकासाची दृष्टी आणि ग्वाही देता येईल, असा उमेदवार सुद्धा परळीतून देता आला नाही, बाहेरचा दिला. मात्र आपले नेते धनंजय मुंडे हे विकासाची दूरदृष्टी असलेले नेते आहेत. पंकजाताई यांचा पराभव वाईट अनुभव म्हणून आपण सोडला मात्र धनंजय मुंडे यांच्या विजयाने महाराष्ट्र हादरला पाहिजे.
परळी मतदारसंघात विकासाची गंगा वाहती ठेवण्यासाठी धनंजय मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन माजी आ.आर टी जिजा देशमुख यांनी गाडे पिंपळगाव येथे बोलताना केले आहे. माजी आ.आर टी देशमुख व वैद्यनाथ कारखान्याचे संचालक, युवक नेते अजय मुंडे यांच्या उपस्थितीत गाडे पिंपळगाव येथे कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यास स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी धनंजय मुंडे हे आपल्या हक्काचे व्यक्तिमत्त्व आहे. इथल्या प्रत्येक घटकांच्या प्रगतीसाठी ते अहोरात्र झटत असतात. त्यामुळे त्यांना निवडून देणे हे आपले कर्तव्य आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाची संपूर्ण जबाबदारी सुद्धा धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. त्याचबरोबर लवकरच वैद्यनाथ कारखाना देखील सुरू होणार असल्याचे वक्तव्य युवक नेते अजय मुंडे यांनी केले आहे.यावेळी श्रीराम मुंडे, लक्ष्मण तात्या पौळ, रमेश कराड, लक्ष्मीकांत कराड, रामेश्वर मुंडे, वसंत राठोड, मनोहर केदार, माऊली साबळे, तुळशीदास अडसुळे, चंद्रकांत सोनवणे, माणिकराव कराड, यांसह आदी उपस्थित होते.