🔺 विधानसभा निवडणूक २०२४
वाशिम / प्रतिनिधी-34 वाशिम मंगरुळपीर मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांना मुस्लिम समाजातील मतदारांनी मतदान करावे असे आवाहन हजरत मौलाना सज्जाद साहब नोमानी यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या व्हिडिओ संदेशांद्वारे केले आहे.त्यांच्या प्रचारार्थ ते दि.16 नोव्हेंबर रोजी वाशिम मध्ये जाहीर सभा घेणार आहेत.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या व्हिडिओ संदेशात हजरत मौलाना सज्जाद साहब नोमानी यांनी म्हटले आहे की, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर हे वाशिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत.राजरत्न आंबेडकर हे एक अभ्यासू आणि हुशार असे नेतृत्व आहे.त्यांचे”कोट” या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा मतदान करावे असे आवाहन हजरत मौलाना सज्जाद साहब नोमानी यांनी केले आहे. दरम्यान मनोज जरांगे यांनी ही त्याला पाठिंबा दिला आहे.
भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल, समता , एकता, मित्रत्व प्रस्थापित करायची असेल तर संविधान विरोधी, देशातद्वेष, भेदभाव करून नफरत पसरविणाऱ्या हद्दपार करायचे असेल तर राजरत्न आंबेडकर यांना विजयी करावेच लागेल.त्यांच्या विजयासाठी नोमानी हे दि.16 नोव्हेंबर रोजी वाशिम मध्ये जाहीर प्रचार सभा घेणार आहेत.या सभेमुळे राजरत्न आंबेडकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे.