आचार्य गुरुराज महाराज अहमदपूरकर यांनी भेटून मुंडेंना दिले विजयासाठी आशीर्वाद

🔶 राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य भक्तीस्थळाचा आशीर्वाद धनंजय मुंडे यांच्या पाठीशी

बीड/ परळी वैद्यनाथ (दि. 14) – लिंगायत समाजाची पंढरी समजल्या जणाऱ्या राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज संजीवन समाधी भक्तीस्थळ अहमदपूर येथील आशीर्वाद धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असून, जनसामान्यांची सेवा करणाऱ्या धनंजय यांच्या पाठीशी आपले आशीर्वाद कायम असल्याचे भक्तीस्थळाचे आशीर्वाद धनंजय यांच्या पाठीशी असल्याचे भक्तीस्थळाचे पालक आचार्य गुरुराज महाराज अहमदपूरकर यांनी धनंजय मुंडे यांच्या भेटीत सांगितले आहे.

धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत आचार्य गुरुराज महाराज यांची धर्मापुरी येथे भेट घेऊन त्यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.

परळी शहरातील विद्यानगर भागात धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून महात्मा बसवेश्वर यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला असून तिथे उभारण्यात आलेल्या उद्यानासही महात्मा बसवेश्वर यांचे नाव देण्यात आलेले आहे.

बीड जिल्ह्यातील शक्तीस्थळ श्री क्षेत्र कपिलधार येथील मंदिर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी देखील धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री म्हणून पुढाकार घेत 100 कोटी रुपयांच्या आराखड्यास पर्यटन विभागाकडून प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.

परळीतील लिंगायत समाजातील बांधवांच्या प्रत्येक सुख-दुःखात देखील धनंजय मुंडे सहभागी असतात. इतकेच नव्हे तर लिंगायत समाजातील अनेक सहकाऱ्यांना धनंजय मुंडे यांनी विविध स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये अनेक मानाची पदे दिलेली आहेत. त्यामुळेच जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता अशी ओळख धनंजय मुंडे यांनी तयार केलेली आहे. दरम्यान आचार्य गुरुराज महाराज अहमदपूरकर यांनी भक्तीस्थळाचे आशीर्वाद धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहेत असे म्हणत विजयी आशीर्वाद दिले आहेत. यावेळी ऍड.गोविंदराव फड, प्रा.चेतन सौंदळे यांसह आदी उपस्थित होते.