🔶 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
🔷 ठाणे जिल्हा माहिती कार्यालय निर्मित
ठाणे :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री.अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे मार्फत “विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 पूर्वपीठिका” तयार करण्यात आली आहे. अशा प्रकारची पर्यावरणपूरक व नाविन्यपूर्ण फ्लिप-बुक स्वरूपातील “विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 पूर्वपीठिका” ही पुस्तिका राज्यात प्रथमच तयार करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृह येथे नुकतेच या डिजिटल पुस्तिकेचे प्रकाशन डिजिटल पद्धतीने जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते संपन्न झाले.
“विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 पूर्वपीठिका” या पुस्तिकेद्वारे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधी व सामान्य नागरिकांकरिता विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 1962 ते 2019 या कालावधीतील ठाणे जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील उमेदवारनिहाय मतदानाची अंतिम आकडेवारी देण्यात आली आहे.
या पुस्तिकेची निर्मिती करण्यासाठी कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी या पुस्तिकेचे मुख्य संपादक म्हणून काम पाहिले आहे. या पुस्तिकेसाठी ठाणे जिल्हा माहिती कार्यालय तथा एकत्रित माध्यम कक्षातील सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
ही पुस्तिका https://tinyurl.com/yhzac932 आणि https://tinyurl.com/42j6f7js या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तरी जास्तीत जास्त प्रसारमाध्यम प्रतिनिधी व सामान्य नागरिकांनी या पुस्तिकेचे जरूर अवलोकन करावे, असे आवाहन ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.