🔷 विधानसभा निवडणुक २०२४🔺 मतदानावर बहिष्कार
बीड-परळी वैजनाथ प्रतिनिधी. परळी तालुक्यातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांचा त्यांच्या गेल्या काही वर्षांपासून थकलेल्या बीलांच्या व इतर प्रश्नांमुळे परळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुक मतदानावर पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्साहात पत्रकार सहभागी होणार नाहीत.
आज दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे विविध वर्तमानपत्रांचे संपादक पत्रकार आदी उपस्थित होते यावेळी गेल्या अनेक वर्षापासून विविध राजकीय पक्षांच्या नेत्याकडे पत्रकारांच्या जाहिरातीचे बीले थकलेली आहेत. जाहिरात बीलां संदर्भात वर्तमानपत्रांच्या संपादकांचा पत्रकारांना सतत मागोवा घेण्यासंदर्भात पाठपुरावा केला जातो. परंतु बीले काही दिले जात नाहीत. लोकसभा निवडणुकीतही आश्वासन मिळाले परंतु आता विधानसभा निवडणुकीचा प्रचारही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे.
अद्याप पत्रकारांची दखल घेण्यात आलेली नाही.
त्यामुळे उद्विग्न होऊन सर्व संपादक व पत्रकारांनी परळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा एकमुखी ठराव घेतलेला आहे. यामध्ये पत्रकारांचे कुटुंबीयही सहभागी आहेत. या निवेदनावर संपादक आत्मलिंग शेटे, ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद शर्मा, संपादक रानबा गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार धनंजय अरबुने, संपादक मोहन वाव्हळे, पत्रकार प्रा. प्रवीण फुटके , प्राध्यापक रवींद्र जोशी, संपादक बालासाहेब फड,पत्रकार धनंजय आढाव, पत्रकार प्रकाश चव्हाण, पत्रकार जगदीश शिंदे, पत्रकार दत्तात्रय काळे, पत्रकार माणिक कोकाटे, पत्रकार समीर इनामदार, पत्रकार पद्माकर उखळीकर,पत्रकार महादेव शिंदे, पत्रकार धीरज जंगले, पत्रकार प्रा. दशरथ रोडे, पत्रकार किरण धोंड, पत्रकार अनुप कुसूमकर,पत्रकार विकास वाघमारे, पत्रकार श्रीराम लांडगे, पत्रकार गणेश आदोडे, संपादक बालाजी जगतकर पत्रकार भगवान साकसमुद्रे, संपादक बालाजी ढगे, संपादक कैलास डुमणे, संपादक अभिमान मस्के,पत्रकार संतोष बारटक्के, पत्रकार महादेव गीते,पत्रकार बाबा शेख, संपादक नितीन ढाकणे, पत्रकार अमोल सूर्यवंशी, पत्रकार प्रकाश वर्मा, पत्रकार शेख मुकरम, पत्रकार संदीप मस्के, पत्रकार विजय रोडे, पत्रकार बालासाहेब मुजमुले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
