🔺माध्यम प्रतिनिधींशी काय बोलणार याकडे लागले सर्वांचे लक्ष
बीड/परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक नेते राजेभाऊ यांची रविवार, दि.17 रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. परळी विधानसभा मतदारसंघातील अनेक मुद्द्यांवर आणि राजकीय परिस्थितीवर ते मध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार असल्याचे संपर्क कार्यालयाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक नेते राजेभाऊ फड हे रविवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक, परळी वैजनाथ येथील संपर्क कार्यालयात रविवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत ते परळी विधानसभा मतदारसंघातील अनेक मुद्द्यांवर तसेच विविध राजकीय मुद्द्यांवर ते प्रकाश टाकणारं असल्याचे सांगण्यात आले आहे. मतदारसंघातील जनतेच्या समस्या, येथील राजकीय परिस्थिती तसेच चालू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक विषय या पत्रकार परिषदेत मांडण्यात येणार असल्याने, ते या पत्रकार परिषदेत काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.