मतदानाच्या पार्श्वभूमीवर दम रेल्वेची प्रवाशांना सुविधा
नांदेड : वेटिंगवर असलेल्या प्रवाशांना अतिरिक्त सुविधा पुरविण्यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेने स्पेशल ट्रेनच्या कोचेसमध्ये तात्पुरत्या स्वरूपात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक (१७६३०) हजुर साहेब नांदेड-पुणे व गाडी क्रमांक (१७६१४) हजुर साहेब नांदेड ते पनवेल या स्पेशल गाडीस थर्ड एसीचा एक व स्लीपरचा शयनयाण एक असे दोन अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत.
प्रवाशांची अधिकची होणारी गर्दीस लक्षात घेत दक्षिण- मध्य रेल्वेने पनवेल व पुणे मार्गावर स्पेशल ट्रेन सुरू केली आहे. मात्र, नव्याने या स्पेशल ट्रेनला दोन अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक (१७६३०) नांदेड-पुणे या गाडीला १८ ते २८ नोव्हेंबरपर्यंत हे अतिरिक्त डबे जोडण्यात येतील. गाडी क्रमांक (१७६२९) पुणे ते नांदेड या एक्स्प्रेसला १९ ते २९ नोव्हेंबरपर्यंत दोन ‘कोचेस राहतील. तर गाडी क्रमांक (१७६१४) नांदेड ते पनवेल या गाडीला १६ ते ३० नोव्हेंबरपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. तर पनवेल-नांदेड (१७६१३) या स्पेशल ट्रेनला १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत अतिरिक्त कोंचेस जोडण्यात येणार आहेत.
