विधानसभा निवडणूक २०२४
६ केंद्र संवेदनशील : नाशिक शहरात ११७९ मतदान केंद्रे
नाशिक – नाशिक आणि मालेगाव महापालिका हद्दीतील सर्व १६७६ मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून घडामोडींचे थेट प्रक्षेपण (वेबकास्ट) करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ६ संवेदनशील तसेच पोलिस आणि प्रत्येक विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी सांगतील त्यानुसार त्या ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे .
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निम्म्या मतदारसंघात सीसीटीव्ही यंत्रणा असणार आहे. २० नोव्हेंबरला जिल्ह्यातील ४९२६ केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, शौचालय, वाहनतळ, खुर्ची आदींची व्यवस्था करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद व महापालिकेकडे देण्यात आली आहे.
शहरी भागातील सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविली जाईल. प्रत्येक मतदारसंघातील मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून
लक्ष ठेवले जाणार आहे . ग्रामीण भागातील ५० टक्के मतदान केंद्रात ही व्यवस्था असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.
🔺 दरम्यान वेबकास्ट (प्रक्षेपण) होणारी होणारी शहरे आणि मतदान केंद्र संख्या
🔺 नांदगाव १७२🔺 मालेगाव मध्य ३४४ 🔺 मालेगाव बाह्य २५३
🔺 बागलाण १४४ 🔺 कळवण १७४ 🔺 चांदवड १५३ येवला १६४🔺 सिन्नर १६९🔺 निफाड १३९🔺 दिंडोरी १८७
🔺 नाशिक पूर्व ३३१🔺 नाशिक मध्य ३०३🔺 नाशिक पश्चिम ४१३🔺 देवळाली २०६ 🔺 इगतपुरी १५०
