बसमध्ये सुमारे रु. ९० लाखाच्या ३ बॅग

🔺विधानसभा  निवडणुक  🔺  नांदेड येथील तिघे घेतलेले ताब्यात 

हिंगोली-वसमत  : विधानसभेच्या निवडणुक प्रचाराचे  शेवटचे दोन तीन  दिवस राहिले आहेत. रोख रकमेची वाहतूक, दारूची विक्री याची मोठ्या प्रमाणात धाम धूम सुरू आहे. निवडणूक आयोग आणि पोलिस यांच्या तपासणी नाक्यावर तपासणीत अनेक बाबी उघड होत आहेत. राज्यात सुमारे ५०० कोटी पेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. नुकतीच   मुंबई येथून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल कंपनीच्या बसमध्ये चिखली फाट्यावर स्थिर निगराणी पथकाने चौकशी केली असता, पैशांनी भरलेल्या तीन बॅगा आढळून आल्या. यामध्ये ८९ लाख ७८ हजार ५०० रुपये असल्याचे आढळून आले. ही बस मुंबईवरून येत होती. या प्रकरणात ‘एसएसटी’ पथकाने ताब्यात घेतलेले तिघे नांदेड येथील आहेत.

१७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान वसमत तालुक्यातील चिखली फाट्यावर ‘स्थिर निगराणी’ पथकाने मुंबई येथून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची तपासणी केली. यावेळी त्यामधील प्रदीप शिंदे, वैभव शिंदे, विठ्ठल कदम (तिघे रा. नांदेड) यांच्याकडे तीन बॅगा सापडल्या आहेत. या बॅगात एकूण ८९ लाख ७८ हजार ५०० रुपये आढळले.  या घटनेची अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.