नाट्य स्पर्धा २०२४-२५ – मराठी नाटक सांस्कृतिक
मुंबई : नोव्हेंबर ते ५ डिसेंबर यादरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६३ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी (मुंबई केंद्र १) साहित्य संघ मंदिर, गिरगाव, चर्नीरोड येथे सुरू होत आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी कळवले आहे.
या स्पर्धेमध्ये एकूण १८ संघांचा सहभाग आहे. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मीचा उत्साह वाढवावा, असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.
![](https://maharashtranewsconnect.com/wp-content/uploads/2024/10/महत्वपूर्ण-ताज्या-घटना-घडामोडी-प्रवास-पर्यटन-स्थळे-खाद्यसंस्कृती-नोकरी-याची_20241001_091754_0000.jpg)