🔺दुर्दैवी मृत्यू🔺अपक्ष उमेदवार 🔺मतदान केंद्र
🔷 Beed: Independent candidate Balasaheb Shinde died at polling booth due to heart attack
बीड– राज्यात २८८ विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदाननाच्या दिवशी बीड विधानसभा मतदारसंघातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच मूत्यू झाला आहे.
बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच मूत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. बीडमधील या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
