विजय सेतुपतीचा ‘महाराजा’ २९ नोव्हेंबर रोजी चीनमध्ये रिलीज होणार

दक्षिण भारतीय चित्रपट –

विजय सेतुपती आणि अनुराग कश्यप यांचा ‘महाराजा’ चित्रपट १४ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. अवघ्या २० कोटी रुपये खर्चुन बनलेल्या या चित्रपटाने जगभरात ११० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. भारतात यशस्वी झाल्यानंतर ‘महाराजा’ आता चीनमध्ये प्रदर्शित होत आहे.बहुचर्चित  ‘महाराजा’ २९ नोव्हेंबर च्या दरम्यान  चीनमधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जवळपास ४० हजार स्क्रीन्सवर रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निथिलन समनाथन यांनी केले आहे.खुद्द विजय सेतुपती  त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली आहे.

विजय आणि अनुराग यांच्याशिवाय ममता मोहनदास आणि नटराजन सुब्रमण्यम या कलाकारांनीही या चित्रपटात काम केले आहे.  हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवरदेखील प्रदर्शित झाला. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. याशिवाय विजय लवकरच ‘विदुथलाई पार्ट २’ या चित्रपटात दिसणार आहे. यात अट्टकठी दिनेश, भवानी श्री, गौतम मेनन, राजीव मेनन, तमिझ आणि मुन्नार रमेशदेखील दिसणार आहेत. चित्रपटाचे संगीत इलैयाराजा यांनी दिले आहे, तर छायांकन आर वेलराज यांनी केले आहे.